शरीराला  थंडावा देणारा ‘गुलकंद’  या आजरांवरही आहे गुणकारी ; जाणून घ्या बनवण्याची पद्धती

शरीराला  थंडावा देणारा ‘गुलकंद’  या आजरांवरही आहे गुणकारी ; जाणून घ्या बनवण्याची पद्धती

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गुलकंदाला आयुर्वेदात फार महत्व आहे. गुलकंद हा गुलाबपाकळ्या आणि साखर याचे मिश्रण करून तयार झालेला पदार्थ आहे. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते. घरच्या घरी आपण हा औषधी पदार्थ तयार करू शकतो. गुलकंदात साखरेचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहींनी गुलकंद खाणं टाळावं. जाणून घ्या गुलकंदाचे सेवन करण्याचे फायदे व बनवण्याची पद्धती

साहित्य –
गुलाबच्या पाकळ्या , साखर ,विलायची , बडिशेप

कृती –
गुलकंदासाठी गुलाब पाकळ्या आणि साखर  घेऊन त्याचा एकावर एक थर घालून घ्यावा. साखरेमध्ये विलायची आणि  बडिशेप टाका. साखरेचे प्रमाण गुलाब पाकळ्यांच्या निम्मे आसावे.
मिश्रणाचे पातेलं झाकून आठवडाभर दिवसा सूर्यप्रकाशात तर नंतर सावलीत ठेवावे आणि दिवसातून एकदा चमच्याने ढवळून घ्यावे.

गुलकंदाचे सेवन करण्याचे फायदे-

ज्यांना सतत विसरण्याची सवय असते त्यांनी दररोज दुधासोबत एक चमचा गुलकंद खावे. यामुळे मेंदूचे कार्य जलद होते.
गुलकंदाच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते.
दररोज गुलकंद खाल्ल्याने क्त शुद्ध होते , त्वचा उजळते , ब्लॅकहेड्स, पिपल्सच्या समस्या दूर होतात.
सतत लघवीचा त्रास होत असेल तर गुलकंदाचे सेवन करावे.
तोंड आल्यास गुलकंदाचे सेवन करावे.
गुलकंद हा एक उत्तम पाचक पदार्थ आहे. उष्णतेपासून होणारे विकार, ताप, रक्तपित्त, कांजिण्या, शारीरिक कमजोरी अशा विकारांवर गुलकंद फायदेशीर आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु