द्राक्ष आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

द्राक्ष आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम आरोग्यासाठी जास्त हानिकारक नसते. द्राक्षाच्या खास आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात.

अशी तयार करा द्राक्ष आइस्क्रिम

साहित्य
* ५०० ग्रॅम द्राक्षे,
* ५०० ग्रॅम दही,
* १ कप साखर,
* अर्धा कप दुधाची पावडर,
* लिंबाचा रस,
* पाव कप क्रिम.

द्राक्षे धुऊन घ्या. मिक्सरमध्ये त्याचा पल्प तयार करा. तो गाळून घ्या. दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवा. या दह्यात पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस व द्राक्ष पल्प घालून सेट होण्यास ठेवा. ३ तासांनी अर्धवट झालेले आइस्क्रीम बाहेर काढा. मिक्सरमधून फिरवून घ्या. पुन्हा सेट होण्यास ठेवा. काही तासांतच आइस्क्रिम होईल. त्यावर द्राक्षांची सजावट करा.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु