आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे

आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अंड्यातील पोषक तत्व मुलांच्या योग्य वाढीसाठी अतिशय लाभदायक असतात. म्हणूनच अंड्याला कंप्लीट फूड असे म्हटले जाते. अंडे उकडून किंवा ऑमलेट बनवून दिल्यास अनेक फायदे होतात. अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशन आणि अमेरिकन एग बोर्डच्या संशोधनानुसार अंड्यात प्रोटीन : ३१ ग्राम, कॅलरी : ७०, फॅट : ४ ग्राम, सोडियम : ६२ मि.ग्रा., पोटॅशियम : ५९ मिग्रा, अशी पोषकतत्व आहेत. मुलांनी रोज एक अंडे खाल्ल्यास कोणते फायदे होतात याविषयी माहिती घेवूयात.

हे आहेत फायदे

स्मरणशक्ती
यातील कोलीनमुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते. उकळलेल्या अंड्यावर मिरपूड टाकून द्यावी.

मजबूत दात
यातील फॉस्फोरसमुळे दात मजबूत होतात. हिरड्यांची समस्या दूर होते. हाफ बॉइल अंडे द्या.

स्टॅमिना
अंड्यातील अमीनो अ‍ॅसिडमुळे स्टॅमिना वाढतो. अंड्यासोबत नट्स खायला द्यावे.

रोग प्रतिकारशक्ती
यातील सेलेनियममुळे मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. रोज नाष्टामध्ये एक ग्लास दूधासोबत अंडे द्यावे.

डोळ्यांची शक्ती
यातील ल्यूटिन डोळ्यांच्या शक्तीसाठी फायदेशीर आहे. अंडयामध्ये काळे मीठ टाकून द्या.

एनीमिया
यातील आयर्नमुळे एनीमिया दूर होतो. अंडे सलादमध्ये मिक्स करुन द्या.

जॉइंट पेन
अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी जास्त असल्याने हाडे मजबूत होतात. यासोबत बदाम आणि एक ग्लास दूध प्यायला द्या.

लठ्ठपणा
यात कॅलरी कमी असल्याने मुलांचा लठ्ठपणा वाढत नाही. मुलांना अंडे उकडून खाऊ घाला.

योग्य विकास
यातील भरपूर प्रोटीनमुळे मुलांची वाढ योग्यप्रकारे होते. हाफ फ्राय ऑमलेट खाऊ घालावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु