रक्तातील कमी झालेल्या प्लेटलेट्स झटपट वाढवण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय

रक्तातील कमी झालेल्या प्लेटलेट्स झटपट वाढवण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – रक्त पातळ होऊ न देण्याचे, तसेच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होऊ न देण्याचे काम प्लेटलेट्स करतात. प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं. जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. रक्तात तिन्ही पेशींपैकी प्लेटलेट्सची संख्या सर्वात जास्त असते. प्लेटलेट्स या मोठया हाडातील रक्तमज्जेत असणाऱ्या कॅरोसाईट या पेशीपासून तयार होतात. डेंग्यू तसेच मलेरियाच्या तापात प्लेटलेट्स कमी होण्याची दाट शक्यता असते. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी खालील पदार्थांचे सेवन करा.

रक्तातील प्लेटलेट्स वाढवणारे पदार्थ –
1)
गुळवेल
गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन सकाळी हे पाणी प्यावे. रक्तातील प्लेटलेट्स लवकर होतात.

2) बीट
बीटाच्या सेवनाने प्लेटलेट्स खूप लवकर वाढतात. तसेच दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या वाढते.

3) नारळ पाणी
नारळ पाण्यामध्ये मिनरल, इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करा.

4) आवळा
रोज सकाळी आवळा खाल्ल्याने प्लेटलेट्स वाढतात. तसेच दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून प्या.

5) पपई
पपई आणि पपईची पाने या दोघांचाही उपयोग प्लेटलेट्स वाढवण्यासाठी होतो. रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईच्या हिरव्या पानांचा रस प्यावा.

6) पालक
पालकाच्या सेवनाने रक्तस्त्राव होण्याचा धोका कमी असतो. पालकच्या भाजीमध्ये ‘क’ जीवनसत्वाचा समावेश असतो. हे ‘क’ जीवनसत्व योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड-क्लॉटिंगसाठी आवश्यक असते. दोन कप पाण्यामध्ये 5-6 पालकाची उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या किंवा पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु