पावसाळ्यात घ्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा, होतील ‘हे’ फायदे

पावसाळ्यात घ्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा, होतील ‘हे’ फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळा म्हंटल की आपल्याला अनेकांना गरम-गरम पदार्थ खायला, प्यायला आवडतात. त्यातच  चहा हे सर्वांच्या आवडीचं आणि उत्तम पेय. त्यामुळे पावसाळ्यात वाजणाऱ्या थंडी पासून मुक्ती मिळावी. म्हणून अनेकजण गरम चहा पिणे करतात. त्यातच जर आपण वेगेवेगळ्या प्रकारचा चहा घेतला तर तुम्हाला पावसाळ्यात खूप मज्जा येईल. आणि ते तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जाणून घेऊया वेगवेगळ्या प्रकारचा चहा पिण्याचे फायदे.

१) ग्रीन टी –

तुम्ही पावसाळ्यात तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टी करू शकता. कारण यामध्ये  ए , बी, सी हे तिनही जीवनसत्व असतात. त्यामुळे हा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

२) दरबारी चहा –

हा चहा पारंपरिक मसाल्यापासून तयार केला जातो. यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तरही खूप कमी होतो. हा चहा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

३) लेमन टी –

हा चहा पिल्याने तुम्ही पावसाळ्यात इंफेक्शनपासून दूर रहाल. तसेच लेमन टी मुळे आपला पोटांच्या विविध समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते. त्यामुळे हा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

४) काश्मिरी चहा –

हा चहा आपल्याला नवीन ठिकाणचा अनुभव करून देतो. हा चहा सुका मेवा आणि ताज्या मसाल्यापासून तयार केला जातो. हा चहा आपल्या आरोग्यासाठी चांगला तर चांगला असतोच. पण यामुळे आपले अंतर मनही आनंदीत राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु