गवारीची भाजी ‘या’ आजारांवरही ‘ही’ उपयुक्त, जाणून घ्या १० फायदे

 
गवारीची भाजी ‘या’ आजारांवरही ‘ही’ उपयुक्त, जाणून घ्या १० फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गवारीची भाजी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहारात वापरली जाते. या भाजीचे उत्पादनही मोठ्याप्रमाणात होते. तसेच यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने औषधी कंपन्याही गवारीची मोठ्याप्रमाणात खरेदी करतात. गवारीची शेती भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये होते. या भाजीचे खास फायदे आणि उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत फायदे

* गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन घ, उ, अ, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम असते. यामध्ये कोणतेही कोलेस्ट्रॉल किंवा वसा आढळून येत नाही. गवारी टॉनिक प्रमाणे आहे. यातील ग्लायको न्युट्रिएन्ट्स डायबिटीज रुग्णांसाठी वरदान आहे. याचे डायट फायबर्स अन्न पचन करण्यात मदत करतात. डायबिटीज रुग्णांनी कच्ची गवार खाल्ल्यास लवकर लाभ होतो.

* यातील कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियममुळे हाडे मजबूत होतात. शारीरिक कमजोर असल्यास गवार दररोज खावी. ही भाजी हृदय रुग्णांसाठी उत्तम आहे.

* गवारीमधील फायबर हे कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवते. काही आदीवासी लोक गवार वाळवून तिची पावडर टोमॅटोबरोबर चटणीप्रमाणे खातात. डायबिटीजच्या रुग्णाला ८० दिवस कमीतकमी दोन वेळेस ही चटणी दिल्यास लाभ होतो.

* गवारी पाण्यामध्ये उकळून हे पाणी दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास लाभ होतो.

* गवारीच्या शेंगामधील बिया रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून या बिया बारीक करून सूज, सांधेदुखी, भाजलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम मिळतो.

* गवारीच्या पानांचा चार चमचे रस आणि लसणाच्या ३-४  कुड्यांचा रस एकत्र करून हे मिश्रण डाग, खाज ठिकाणी लावावे.

* कच्ची गवार बारीक करून टोमॅटो आणि कोथिंबिर टाकून चटणी तयार करून घ्यावी. दररोज या चटणीचे सेवन केल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु