भावी पिढी शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ असावी

भावी पिढी शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ असावी

अहमदनगर : आरोग्यनामा ऑनलाईन – आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक आणि आधारस्तंभ आहेत. देशाची ही भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्टया अधिक सुदृढ असायला हवी, असे प्रतिपादन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी केले.

स्नेहबंध सोशल फाउंडेशन व गोरे डेंटल, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडीतील अपंग संजीवनी मूकबधिर विद्यालयात दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजपुत बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, प्राचार्य एकनाथ जगताप, दिलीप जगधने, मुख्याध्यापिका विद्या भावले, संजय शिंदे, अभिजित ढाकणे, स्वदीप खराडे, तुषार मेघळे, तेरेजा भिंगारदिवे आदी उपस्थित होते. डॉ. सुदर्शन गोरे यांनी या विद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांची दातांची तपासणी केली. सहायक पोलीस निरीक्षक राजपूत म्हणाले, स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे. सामाजिक जाणिवेतून गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी फाउंडेशन नेहमीच सक्रिय असते. विद्यार्थ्यांना दंत तपासणीनंतर खाऊ वाटप करण्यात आले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु