‘फंगस’ झालाय ? पावसाळ्यात ‘अशी’ घ्या पायांची काळजी, मिळेल आराम

‘फंगस’ झालाय ? पावसाळ्यात ‘अशी’ घ्या पायांची काळजी, मिळेल आराम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात पाय हमखास भिजतात. परंतु, आपण घरी आल्यानंतर केवळ हात आणि डोकं व्यवस्थित स्वच्छ करतो. पायांकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच कामाच्या ठिकाणीही शूज नसल्यास पाय बराच वेळ ओले राहतात. अनेकदा घरी सुद्धा पाय नीट कोरडे केले जात नाहीत. पायांच्या बोटांच्या मध्ये ओलसरपणा तसाच राहतो. यामुळे तेथे फंगस होण्याची भिती असते. या ठिकाणी इंन्फेक्शन सुद्धा होऊ शकते. हा त्रास होऊ नये म्हणून पावसाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजे.

अशी घ्या पायांची काळजी

* नियमित पॅरिक्योअर करा. यामुळे पाय मऊ होऊन बोटांची स्वच्छता देखील होते.

* पायाच्या नखांना शेप देत राहा. यामुळे घाण निघून जाईल. नखे काढल्यानंतर डेटॉल लावावे. यामुळे इंन्फेक्शन होणार नाही.

* सिरका वापरावे. याने पायामध्ये साठलेली घाण चांगली स्वच्छ होते. बादलीमध्ये सिरका आणि पाणी बरोबरीने एकत्र करावे. यामध्ये पाय ३० मिनिटांसाठी ठेवावे.

* बेकिंग सोड्याचा उपयोग करावा. यामुळे पी.एच. बॅलेंस होतो. पेस्ट बनवून पायाला लावता येते.

* मीठ हे सर्वात उत्तम अ‍ॅन्टीसेप्टिक आहे. पाण्यात २ मोठे चमचे मीठ टाकून त्यामध्ये १० ते १५ मिनिटे पाय सोडून बसावे.

* पाण्यात थोडीशी हळदीची पेस्ट बनवून घ्यावी. इन्फेशनच्या ठिकाणी ही पेस्ट लावावी.

* लिंबाचे तेल अ‍ॅन्टी फंगल असल्याने फंगस वाढत नाही.

* नारळाचे तेल फंगस झालेल्या जागेवर लावल्यास त्रासापासून आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु