‘फुल फॅट’च्या दुधामुळे कमी होतो मधुमेह, उष्माघात, हृदयाच्या आजारांचा धोका

‘फुल फॅट’च्या दुधामुळे कमी होतो मधुमेह, उष्माघात, हृदयाच्या आजारांचा धोका

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फुल फॅटयुक्त दूध आरोग्यासाठी हानिकार असल्याचे सांगितले जाते; मात्र, नवीन संशोधनांनुसार यामुळे फायदा होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे मधुमेह, उष्माघात व हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. कॅनडातील पॉप्युलेशन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचे पोषण आहारतज्ज्ञ महशिद देहगन यांनी हा दावा केला आहे.

नवीन संशोधनातील दावे
* दिवसातून तीनदा फुल फॅटचे दूध वा दुग्धजन्य उत्पादने सेवन केल्यास लवकर मृत्यू, हृदयाचे आजार व उष्माघाताचा धोका कमी होतो. तसेच एक वेळपेक्षा कमी या उत्पादनांचे सेवन करणारांच्या तुलनेत असे लोक अधिक सुरक्षित असतात.

* फुल फॅटच्या दुधात व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम व प्रोटीनसह अनेक पौष्टिक घटक असतात.

* चरबी असलेले दुग्धजन्य पदार्थ सेवन करत असलेल्यांना हृदयाचे आजार, टाइप-२ चा मधुमेह व स्थूलतेचा धोका कमी असतो. कमी फॅट सेवन करणारे कमी कॅलरीची भरपाई खराब रिफाइंड कार्बोहायड्रेट्सच्या माध्यमातून करतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु