वारंवार पोट खराब होते का? या टिप्सने २ दिवसात सुधारेल डायजेशन

वारंवार पोट खराब होते का? या टिप्सने २ दिवसात सुधारेल डायजेशन

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  पोट खराब होणे ही समस्या आता खुपच वाढल्याचे दिसून येते. खाण्याच्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अ‍ॅसिडिटी आणि बध्दकोष्ठतेची समस्या अनेकांना होते. ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय असून हे रोज केल्यास फक्त २ दिवसातच डायजेशन सुधारते. हे उपाय जाणून घेवूयात.

हे उपाय करा

१) अर्धा चमचा मोठी विलायची पावडर आणि अर्धा चमचा खडीसाखर पावडर सकाळ, संध्याकाळ घ्या.

२) एक कप पाण्यात एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीसोप टाकून उकळवा. कोमट झाल्यावर प्या.

३) हिंगाच्या पाण्यात कपडा भिजवून पंधरा ते वीस मिनिटे नाभीवर ठेवा.

४) दोन ग्लास पाण्यात दोन चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून उकळवा. याचा काढा तयार करून सकाळ, दुपार, संध्याकाळ चार चमचे घ्या.

५) एक चतुर्थांश चमचा सुंठ, एक चमचा बडीसोप आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करून सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्या.

६) अर्धा चमचा हरडचे चूर्ण सकाळ, संध्याकाळ मधासोबत घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु