‘या’ कारणांमुळे डोळ्याखाली होतात काळी वर्तुळे, जाणून घ्या उपाय

‘या’ कारणांमुळे डोळ्याखाली होतात काळी वर्तुळे, जाणून घ्या उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लोह आणि व्हिटॅमिनची कमतरता, शरीरात पाण्याची कमतरता यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे होण्याची समस्या होते. यामुळे सौंदर्यावर परिणाम होतो. ही समस्या होण्याची कारणे आणि उपाय याविषयी सविस्तर माहिती घेवूयात.

ही आहेत कारणे

पाण्याची कमतरता
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे ही समस्या होऊ शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांखालील त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू लागते. यासाठी भरपूर पाणी प्या.

लोहाची कमतरता
लोहाच्या कमतरतेमुळे त्वचेच्या पेशींना पुरेसा ऑक्सीजन मिळत नाही. यामुळे डोळ्यांच्या भोवताली काळी वर्तुळे होतात. अ‍ॅनिमिया झालेल्यांना हा त्रास जाणवतो. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, पालक, बीन्स, ओट्स, डाळी, शेंगदाणे, ब्राउन राइस, गहू आणि सुक्यामेव्याचा समावेश करा.

व्हिटॅमिन सी
शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे काळी वर्तुळे होतात. संत्र, लिंबू, बटाटे, पालक, फूलकोबी आणि ब्रोकलीपासून व्हिटॅमिन सी मिळू शकते.

करा हे उपाय

१) थंड झालेले कच्चे दुध कापसाच्या बोळ्याने डोळ्यांखाली दिवसातून दोनवेळा लावा. लवकर फरक दिसून येतो.

२) उन्हात वाळविलेल्या संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये थोडे गुलाब जल मिसळून डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. काळी वर्तुळे लवकर जातील.

३) वापरलेले टी बॅग्सला थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर या बॅगला काळ्या वर्तुळांवर ठेवा. यातील टॅनिन डोळ्यांच्या आजूबाजूची सूज आणि काळेपणा कमी करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु