रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

रोज सकाळी  ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  : आजकाल प्रत्येक लोक इतके व्यस्त झालेले असतात की त्यांना स्वतः हा कडे पाहायलाही वेळ नसतो. या व्यस्त जीवनात त्यांना पुरेसा आरामही  मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत जातो. जर तुम्हाला तणाव कमी करून थोडा आराम करायचा असेल तर रोज सकाळी खालील हे  प्रकार करून पहा

    रोज सकाळी  ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

– प्रत्येकांना आज काल  सवय लागली आहे की घरातील दरवाजे आणि खिडक्या नेहमी बंद करून ठेवतात. तर ती सवय आधी मोडा. सकाळी सर्वप्रथम आधी उठल्यानंतर घरातील खिडकी, दरवाजे उघडा. यामुळे सकाळची ताजी हवा आणि कोवळे सूर्यकिरण घरात आल्याने घर प्रसन्न वाटते. तसेच शरीरातील मेलाटोनीनची निर्मिती कमी होते आणि एड्रनलिन वाढते. म्हणून तुम्हची दिवसभरात चीडचीड होत नाही.

रोज सकाळी  ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

– आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्याला व्यायाम करायला वेळी मिळत नाही. पण सकाळी आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून किमान ३० मिनिटे तरी व्यायाम करावा. व्यायाम केल्याने तणाव नक्कीच कमी होतो. म्हणून रोज सकाळी उठल्यावर व्यायाम नक्की करा.

रोज सकाळी  ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

– व्यायामासोबतच चिंतन करणे ही उत्तम असते. चिंतनाने शरीरातील सगळा थकवा निघून जातो. तसेच दिवसाची सुरुवात चांगली होण्यासाठी तुम्ही सकाळी गाणे सुद्धा ऐकू शकता.

– रात्री नेहमी झोपण्यापूर्वी अलार्म लावावा. यामुळे सकाळी वेळेत उठून आपल्या कामाला आपण सुरुवात करू शकतो. आणि आपली घाई सुद्धा होत नाही. सकाळ पासूनची सगळी कामे वेळेत होण्यास सुरुवात होते. रोज सकाळी  ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु