महिलांमध्ये ‘या’ ५ गोष्टींमुळे वाढते फर्टिलिटी, आजपासूनच करा आहारात समावेश

महिलांमध्ये ‘या’ ५ गोष्टींमुळे वाढते फर्टिलिटी, आजपासूनच करा आहारात समावेश

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आई होणे हे जगातील सर्वात मोठे सुख असल्याचे म्हटले जाते. परंतु, सध्या वाढलेला ताणतणाव, अनियमित पिरियड्स, अल्कोहलचे सेवन, लठ्ठपणा, अयोग्य आहार आणि जीवनशैलीशी संबंधीत अनेक घटकांमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येते. महिलांची प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी आहारतज्ज्ञ त्यांना योग्य आहार घेण्याचा सल्ला देतात. कोणत्या पाच गोष्टींचे सेवन केल्याने महिलांची प्रजनन क्षमता वाढू शकते, याविषयी माहिती घेवूयात.

हे आहारात घ्या

१) मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी
हार्मोनल बदलांना नियमित करण्यासाठी या दोन्ही गोष्टींची शरीराला खुप आवश्यकता असते.

२) झिंक
सामान्य प्रजननात हे खुप जरूरी असते.

३) व्हिटॅमिन डी
रोगप्रतिकार प्रणाली योग्यप्रकारे काम करण्यासाठी याची आवश्यकता असते.

४) व्हिटॅमिन ई
तणाव थांबविण्यासाठी याचा उपयोग होतो.

५) फॉलिक अ‍ॅसिड
गर्भावस्थेत मुख्यपेशींना वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो.

प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी आहार

१) हिरव्या पालेभाज्या खा. यातील आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सीडेंटमुळे महिलांना गरोदर राहण्यास मदत होते.

२) लवकर गरोदर राहण्यासाठी आहारात सुकामेवा घ्यावा. यातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड शरीरासाठी अतिशय लाभदायक असते.

३) लवकर गरोदर राहण्यासाठी फळांचे सेवन केले पाहिजे. संत्रे, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि किवीसारखी फळे रोज सेवन केली पाहिजेत. यातील व्हिटॅमिन सीमुळे महिला लवकर गरोदर होऊ शकते.

४) आहारात फायबरयुक्त म्हणजेच तंतुमय पदार्थांचे सेवन करावे. कडधान्य, गव्हाची चपाती, ब्राउन राइस आणि बिन्स आहारात घ्यावे.

५) तसेच आहारात नियमित दुधाचे सेवन करावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु