” उपवास ” हा आरोग्यासाठी फायदेशीर मात्र या लोकांसाठी घातक

” उपवास ” हा आरोग्यासाठी फायदेशीर मात्र या लोकांसाठी घातक

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आपल्या नित्याच्या जीवनात निरनिराळ्या व्रतोत्सवांच्या निमित्याने वेगवेगळे उपवास केले जातात. उपवास हे अनेकवेळा व्यक्तिगत पातळीवर आणि काहीवेळा सामजिक पातळीवर केले जातात. उपवास हे एक साधे आणि सर्वसामान्याना करता येण्यासारखे व्रत आहे. उपवासचा सर्व सामान्य अर्थ म्हणजे काही काळ अन्न ,पाणी न घेणे म्हणजे उपवास होय. उपवास केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. परंतु काहींना जास्त वेळ उपाशी राहणे. जमत नाही किंवा ते त्यांच्या आरोग्याला घातक असते.

या लोकांनी उपवास करू नये 

१) गर्भवती महिलांनी कधीच उपवास करू नये कारण त्यांना सतत जीवनसत्त्वांची गरज असते. आणि उपवास केल्याने पाहिजे तेवढ्या प्रमाणात जीवनसत्व मिळत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या बाळावर होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी कधीच उपवास करू नये.

२) ज्या व्यक्तींना हृदयाचे आजार आहेत. त्यांनी कधीच उपवास करू नयेत. उपवासामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

३) जे अशक्त आहेत त्यांनी पण उपवास करू नयेत. कारण त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची आधीच कमतरता असते. उपवासामुळे ते अजून अशक्त होऊ शकतात.

४) ज्यांना फुफुसाचे आजार आहेत. त्यांनी उपवास करू नये.

५) ज्यां व्यक्तीची नुकतीच एखादी शस्रक्रिया झाली आहे. त्यांनी उपवास करू नये. कारण त्यांना ती जखम बरी होणे गरजेचे असते. त्यासाठी जेवण व्यवस्थित करावे लागते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु