या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे जीवनशैली तणावपूर्ण बनली आहे. दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तसेच शरीर आणि मनावरील ताणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कामाबरोबरच आरोग्याला आणि व्यायामालाही तितकच महत्त्व दिलं पाहिजे. मात्र व्यायामासाठी जर अधिक वेळ काढू शकत नसाल तर चिंतीत होऊ नका कारण असेही काही व्यायामप्रकार आहेत जे अगदी कमी वेळात करता येतील मात्र त्याचे सकारात्मक फायदे दिसून येतील.

१) मानेसाठी व्यायाम – सरळ उभे राहा.तुमचा डावा हात डोक्यावरून घेत उजव्या कानावर ठेवा. त्यानंतर मान हळूहळू डाव्या बाजूला झुकवा. समान कृती विरुद्ध बाजूला करून मानेला ताण द्या. हळूहळू पूर्वस्थितीत या.

या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

२) सायकलिंग – जमिनीवर स्थिर झोपा. तुमचे दोन्ही हात तुमच्या दोन बाजूला लांब करा. सायकल चालवल्याप्रमाणे एका मागे एक पाय वर-खाली करा. हीच कृती उलटही करा.

३) पायांसाठी व्यायाम – जमिनीवर झोपा. दोन्ही पाय दुमडून छातीपर्यंत घ्या आणि दोन्ही हातांनी पायांना घट्ट पकडा. काही वेळानंतर पुन्हा पूर्वस्थितीत या.

४) पोटऱ्यांसाठी व्यायाम – सरळ उभे राहा. पावले सरळ आणि एकमेकांना समांतर असू द्या. आता हळूहळू तुमच्या टाचा वर करा आणि चवडय़ांवर उभे राहण्याचा प्रयत्न करा. असे करताना पोटऱ्यांवर ताण येईल. त्यानंतर हळूहळू टाचा खाली घ्या.

५) गुडघ्यासाठी व्यायाम – दोन्ही पाय एकत्र करून ताठ उभे राहा. त्यांनतर उजवा पाय जमिनीवर ठेवून डावा पाय मागे दुमडा. दुसरा पाय आणि कंबर अगदी ताठ ठेवा.

६) भुजंगासन – पोट जमिनीला टेकवून झोपा आणि दोन्ही हाताचे तळवे खांद्याच्या खाली ठेवा. डोकं आणि छाती जमिनीपासून वर उचलावी. त्याचं अवस्थेत थोडा वेळ राहून पुन्हा पूर्वस्थितीत या.

या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

७) मणक्याचा व्यायाम – जमिनीवर झोपा. पायाचे तळवे न हलवता एका बाजूचा गुढघा पाय न वाकवता दुसऱ्या बाजूला न्या.

८) अपवर्ड स्ट्रेच – दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंतवून हात डोक्याच्या वर न्या . हे करताना तुमचा मणका आणि हात यांच्यावर ताण पडला पाहिजे.

९) बटरफ्लाय स्ट्रेच – पाय पुढच्या दिशेने सरळ करुन बसा. नंतर पायाचे दोन्ही तळवे एकमेकांना जोडून जमिनीवर बसा.पाठीचा कणा ताठ राहील व तुम्हाला आराम मिळेल याची काळजी घ्या. टाचा शरीराजवळ ओढून गुडघे वर व खाली करणे सहज शक्य होईल. हा व्यायाम करताना केलेली हालचाल एखाद्या फुलपाखराच्या पंखाप्रमाणे दिसते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु