अधिक प्रमाणात तुपाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ; जाणून घ्या ‘योग्य मात्रा’

अधिक प्रमाणात तुपाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ; जाणून घ्या ‘योग्य मात्रा’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आयुर्वेदात तुपाला ऊर्जा प्रदान करणारा पदार्थ म्हटले आहे. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात.  तूप खाल्याने शरीराचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. मात्र  तूप खाण्यासाठी काही योग्य प्रमाण आहे. त्यापेक्षा  अधिक प्रमाणात तुपाचे सेवन केले तर , शरीरात चरबी वाढते व शरीराचे नुकसान होते. जाणून घ्या किती मात्रात तूप खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे.

जेवणातील तुपाची मात्रा

दररोज १० ते १५ ग्रॅम तूप  खाणं गरजेचं आहे.
आयुर्वेदानुसार सकाळी उठताच नाश्तापूर्वी साजूक तूप प्यायल्यास अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दिवसातून दोन चमचे तूप खावे.
रोजच्या जेवणात एक चमचा तूप घेतल्याने शरीराला स्निग्धता व पौष्टिक घटक  मिळतात .  तूप पातळ असल्यास त्याचे प्रमाण थोडेसे अधिक चालू शकेल.
काही भाज्यांना तुपाची फोडणीही देता येईल.
तुपातील गोड पदार्थ खाण्यावर मात्र र्निबध हवा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु