जास्त कॅलरीच्या फूडमुळे होते शरीराचे नुकसान, टाळावे ‘हे’ ७ पदार्थ ? जाणून घ्या

जास्त कॅलरीच्या फूडमुळे होते शरीराचे नुकसान, टाळावे ‘हे’ ७ पदार्थ ? जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरुषांना एका दिवसात पंचवीसशे तर महिलांना दोन हजार कॅलरीची गरज असते. परंतु, यापेक्षा जास्त कॅलरीज घेतल्यास वजन वाढते. त्यामुळे काही पदार्थांचे गरजेपेक्षा जास्त सेवन टाळले पाहिजे. लठ्ठपणा ही समस्या अनेक आजारांना निमंत्रण देणारी असल्याने याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. जास्त कॅलरीचे पदार्थ मर्यादित खाल्ले पाहिजेत. कोणते पदार्थ यासाठी टाळावेत याविषयी माहिती घेवूयात.

पांढरा ब्रेड
१०० ग्रॅममध्ये २६५ कॅलरी असल्याने लठ्ठपणा वाढतो. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची शक्यता वाढते.

डार्क चॉकलेट
१०० ग्रॅममध्ये ५९८ कॅलरी असल्याने मधुमेह होऊ शकतो. वजन वाढू शकते.

तूप
१०० ग्रॅम तुपात ८७६ कॅलरी असल्याने लठ्ठपणा वाढतो. उच्च रक्तदाबही होऊ शकतो.

चीज
१०० ग्रॅम चीजमध्ये ४०३ कॅलरी असल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो. पोटाची चरबी वाढते.

मांस
१०० ग्रॅममध्ये १८७ कॅलरी असल्याने हृदयविकाराची शक्यता असते. मधुमेह ही होऊ शकतो.

लस्सी
१ ग्लासात २३० कॅलरी असतात. रोज लस्सी घेतल्याने वजन वाढते. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

चरबीयुक्त दूध
१ ग्लासात दुधात ३९२ कॅलरी असतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. वजनही वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु