दररोज आपण स्पर्श करतो आजार पसरवणाऱ्या ‘या’ १० वस्तूंना

दररोज आपण स्पर्श करतो आजार पसरवणाऱ्या ‘या’ १० वस्तूंना
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपण घर तसेच कामाच्या ठिकाणी अनेक अस्वच्छ वस्तूंना हात लावत असतो. परंतु, आपल्याला वाटत असते की, आपण कोणत्याही घाणेरड्या वस्तूंना हात लावलेला नाही. घरात अशा अनेक वस्तू असतात, ज्या अस्वच्छ असतात. ज्यांची स्वच्छता नियमित केली जात नाही. या वस्तूंवर अनेक किटाणू असतात जे शरीरात गेल्यास आजारपण येते. अशा अस्वच्छ वस्तूंविषयी माहिती घेवूयात.

दरवाजाची कडी, हँडल
अनेक लोक वॉशरूममधून आल्यानंतर हात धुवत नाहीत. त्यांना हे वाचून आश्चर्य वाटेल की, संपूर्ण घरात सर्वात जास्त किटाणू वॉशरूमच्या दरवाजाच्या हँडलवर असतात.

फ्रीजचे हँडल
फ्रीजच्या हँडलवर सुद्धा भरपूर जर्म जमा झालेले असतात. दिवसभरातून आपण अनेकवेळा फ्रीजचा वापर करतो याचा अर्थ आपण किटाणूंच्या संपर्कात येत असतो.

पैसे
आपण दररोज पैशांची देवाणघेवाण करत असतो. एका शोधानुसार, एका नोटेवर १,३५,००० बॅक्‍टेरिया असतात, जे कोणताही गंभीर आजार निर्माण करू शकतात.

कीबोर्ड
संगणकाच्या कीबोर्ड सुद्धा अनेक किटाणू असतात जे आजाराला कारणीभूत ठरू शकतात.

टॉयलेट सीट
टॉयलेट सीटला आपल्या शरीराचा स्पर्श होत असतो. यामुळे असंख्य किटाणू आपल्या संपर्कात येतात. टॉयलेट सीटच्या एक इंचामध्ये कमीत कमी २९५ किटाणू असतात.

रिमोट 
घरामध्ये रिमोटचा वापर सर्वजण करतात. रिमोटवर सुद्धा असंख्य किटाणू असतात.

मोबाईल फोन
मोबाईल फोनवर सुद्धा भरपूर किटाणू जमा झालेले असतात.

स्विच बोर्ड
घरातील स्विच बोर्ड अत्यंत अस्वच्छ असतात. यामध्ये किटाणूंचे प्रमाण जरा जास्तच असते. एका शोधानुसार एक स्विचमध्ये २१७ किटाणू असतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु