संध्याकाळीहीकरू शकता व्यायाम, सकाळ एवढाच फायदेशीर

संध्याकाळीहीकरू शकता व्यायाम, सकाळ एवढाच फायदेशीर

आरोग्यनामा ऑनलाइन – सकाळी एक्सरसाइजसाठी वेळ मिळत नसल्यास ऑफिसवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी एक्सरसाइज करू शकता. एक्सरसाइज, वर्कआउट आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीचा फायदा फक्त सकाळ होतो, असे अनेकांना वाटते. परंतु, संध्याकाळी केलेली एक्सरसाइजही सकाळच्या एक्सरसाइज एवढीच फायदेशीर असल्याचे संशोधकांनी संशोधनातून सिद्ध केले आहे.

सेल मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनातून असे नमूद केले आहे की, एक्सरसाइजचा शरीरावर होणारा परिणाम हा दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेच्या आधारावर वेगवेगळा असू शकतो. सकाळी आणि संध्याकाळी करण्यात आलेल्या एक्सरसाइजचा परिणामांमध्ये एक महत्त्वपूर्ण अंतर दिसून येते. सकाळी केलेला व्यायाम स्नायूंच्या पेशींमध्ये जीन प्रोग्रा सुरू करते. ज्यामुळे ते अधिक प्रभावी होऊन फॅट आणि शुगरची मेटाबॉलिज्मच्या प्रक्रियेमध्येही सक्षम असतात. दुसरीकडे संध्याकाळी एक्सरसाइज केल्याने उंदरांच्या स्नायूंमध्ये मेटाबॉलिज्म प्रोसेस वाढत असल्याचे दिसून आले. परंतु तेच सकाळी व्यायाम केल्याने थोड्या वेळासाठीच शरीरात ऊर्जा तयार होण्याचे प्रमाण वाढते.

संशोधकांनी स्नायूंच्या पेशींमध्ये होणाऱ्या अनेक परिणामांचा सखोल अभ्यास केला. ज्यामध्ये ट्रासक्रिप्शनल प्रतिक्रिया आणि मेटाबॉलिज्मवर होणाऱ्या परिणामांचाही समावेश होता. या परिणामांनुसार, सकाळी व्यायाम केल्यानंतर दोन्ही क्षेत्रांमधील प्रतिक्रिया अधिक मजबुत होतात आणि एका केंद्रिय तंत्राद्वारे नियंत्रित केल्या जातात. ज्यामध्ये प्रोटीन एचआयएफ १-अल्फाचा समावेश करण्यात आला होता. जे थेट शरीराचं बॉडी क्लॉक नियंत्रित करण्याचं काम करतं.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु