जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम

जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  डासांच्याा प्रादुर्भावामुळे मनुष्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. तसेच यामुळे जनावरांवरही वाईट परिणाम होत असतो. डासांच्या उपद्रवामुळे जनावरे तणावात आल्याने दूध उत्पादन क्षमतेवर सुमारे दहा ते पंधरा टक्के परिणाम होतो. यासाठी पावसाळ्यात प्राण्यांची काळजी घेणे, गरजेचे ठरते.

हे आहेत परिणाम
* डास वारंवार चावल्यामुळे जनावर त्रस्त होतात.
* योग्यप्रकारे चारा खाऊ शकत नाहीत.
* पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे जनावरांच्या पायांना डास जास्त चावतात.

अशी घ्यावी काळजी
१)
प्राणी बांधण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी.
२) मच्छरदाणी लावावी अथवा धूर करून डासांना पळवून लावावे.
३) जनावरांच्या शरीरावर लिंबाचे तेल लावावे.
४) कडुलिंब आणि तुळशीचे पाने जाळून धूर करावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु