आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला

आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखाद्या किरकोळ आजारातून नंतर मोठा आजार झाल्याचे समजते. म्हणजेच हा किरकोळ आजार मोठ्या आजाराचे लक्षण असते. यासाठी कोणत्याही किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जाणे कधीही चांगले असते. यासाठी आरोग्यासंबंधित प्रत्येक बदलाला गांभीर्याने घेतले पाहिजे.काही लक्षणांना सामान्य गोष्ट म्हणून टाळणे घातक ठरू शकते.

अचानक मन एकाग्र करण्यात अडचण होत असेल, स्मृती कमी झाल्यासारखी वाटत असेल, सारखी चिडचिड होत असेल तर ही लक्षणे अनिमिया, कमी रक्तदाब, अतिसार किंवा हार्मोन्स बदलाची असू शकतात. तसेच भूक न लागणे, जेवण न आवडणे किंवा थोड्याशा जेवणाने पोट भरल्यासारखे वाटणे, अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. चेकअप करून नेमका काय आजार आहे याची माहिती घ्यावी. कारण ही काविळीची लक्षणे असू शकतात. तसेच श्वसनासंबंधी त्रास होणे हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. १० सेकंदासाठी जेव्हा श्वसन मार्गात अडथळे निर्माण होतात, त्या वेळी घोरण्याचा त्रास जाणवतो. घशातील स्नायू आणि मृदू पेशी झोपेत श्वसनमार्गात येतात तेव्हा घोरण्याचा त्रास होतो.

तसेच थोडे श्रम केले तरी दम लागणे हे अँब्स्ट्रोक्टिव्ह पल्मोनरी, अस्थमा, न्यूमोनियाचे लक्षण असू शकते. तसेच हा फुप्फुस, हृदयाच्या कार्यप्रणालीत बिघाड झाल्याचा संकेत असू शकतो. ५० ते ९० हार्ट बीट्स एका मिनिटात असणे हे वयस्कांच्या चांगल्या आरोग्याचे प्रमाण मानले जाते. मात्र, हे प्रमाण जास्त असणे हृदयासाठी घातक ठरते. तसेच १२० दिवसांत तांबड्या रक्तपेशी तयार होतात; परंतु पोषक आहार न घेणे किंवा अन्य कारणाने असे होत नसल्यास अनिमियाची शक्यता वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु