असा दूर करा विसरभोळेपणा, जगा आनंदी आयुष्य

असा दूर करा विसरभोळेपणा, जगा आनंदी आयुष्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्वच वयोगटात विसरण्याचा आजार आढळून येतो. एकाग्रता हे विसरण्याचे मुख्य कारण आहे. एखादी गोष्ट आठवण्यासाठी लागणारे पोषकतत्व कमी पडल्याने विसरभोळेपणा वाढतो. विसरभोळेपणा दूर करणाऱ्या पोषकतत्त्वांची माहिती करून घेतल्यास यावर सहज उपाय करता येतो. या उपायांनी विसरभोळेपणा दूर होऊन तुम्ही अगदी आनंदी आयुष्य जगू शकतो.
विसरभोळेपणा दूर करण्यासाठी रोज एक सफरचंद खाणे शरीरासाठी अतिशय लाभदायी आहे.

तसेच नियमितपणे सफरचंद खाऊन अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. तसेच विचार करण्याच्या क्षमतेला बल प्रदान करण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग होतो. डोक्यातील कोशिकांची संख्या वाढविणे, स्मरणशक्तीत सुधारणा करणे, तसेच शिकण्याची क्षमता वाढविण्यासाठी ग्रीन टी अतिशय गुणकारी आहे. नऊ बदाम रात्री पाण्यात भिजायला ठेवून सकाळी साल काढून बदामची बारीक पेस्ट तयार करावी. एक ग्लास गरम दूधात ही पेस्ट मिसळावी. यात दोन चमचे मध घालून जरा वेळानंतर हे दूध प्राशन करावे. त्यानंतर किमान दोन तास काही खाऊ नये. स्मरणशक्ती वाढीसाठी हा रामबाण उपाय आहे.

जे व्यक्ति सकाळी कॉफी घेतात ते कॉफी न घेणाऱ्या व्यक्तिंच्या तुलनेत अधिक लवकर कामे आटोपतात. दुपारी अशी तरतरी हवी असेल तर कॉफी घ्यावी. सक्रियता, मूड आणि लक्ष मेंदुतील ज्या भागात केंद्रीत असते त्याला कॉफी सचेत करते. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी दालचीनीचे तेल अतिशय गुणकारी आहे. हे तेल शरीरातील कॅलेस्टरॉलची मात्रा कमी करते. यामुळे डोके अधिक गतीने काम करते. हे तेल तुमच्या डोक्याला समाधान देते. डोके शांत राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु