वडीलांमध्ये असेल ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, तर मुलांवर होतो परिणाम

वडीलांमध्ये असेल ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, तर मुलांवर होतो परिणाम

आरोग्यनामा ऑनलाईन टीम : आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डी ची कमतरता असण्याचे प्रमाण खुप जास्त आहे. विशेष म्हणजे वडिलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्याचे परिणाम मुलांवर दिसून येतात. मुलांची उंची, वजन न वाढणे, अशा समस्या होऊ शकतात, असे संशोधनात आढळून आले आहे.

वडीलसुद्धा जबाबदार
बाळाला कोणताही त्रास झाला तर तो आईच्या प्रकृतीमुळेच झाला, असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धतच झाली आहे. परंतु, बाळावर होत असलेल्या काही आरोग्याच्या समस्यांना वडीलसुद्धा जबाबदार असल्याचे आता संशोधनात आढळून आले आहे.

यानंतरच बाळाला जन्म द्या
म्हणून बाळ निरोगी आणि सुदृढ हवे असल्यास वडीलांनी सुद्धा सदृढ राहिले पाहिजे. वाईट सवयी, आरोग्याच्या काही समस्या असल्यास वेळीच औषधोपचार केले पाहिजेत. यानंतरच बाळाला जन्म देण्याचा विचार करावा.

Visit : Arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु