ई-सिगरेटने धूम्रपान सोडणे शक्य नाही, संशोधकांचे मत

ई-सिगरेटने धूम्रपान सोडणे शक्य नाही, संशोधकांचे मत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – इलेक्ट्रॉनिक सिगरेटमध्ये धुराऐवजी निकोटीन निघते. इलेक्ट्रॉनिक सिगरेटद्वारे धूम्रपानापासून सुटका मिळू शकते का, यावर आरोग्यतज्ज्ञ शोध घेत आहेत. या विषयावर फारसे संशोधन झालेले नाही. धूम्रपानाची सवय सोडवण्याच्या ई-सिगरेटच्या क्षमतेवर काही संशोधकांनी संशोधन केले.

संशोधकांनी सिगारेट पिणाऱ्या ९४९ जणांचा अभ्यास केला. यातील ८८ लोक ई-सिगारेटचाही वापर करत होते. या संशोधनात असे आढळून आले की, ई-सिगरेट पिण्याने त्यांना वर्षभरात सिगारेट सोडण्यास किंवा कमी करण्यास यश आले नाही.

ई-सिगरेटला सामान्य सिगारेटच्या तुलनेत सुरक्षित समजले जाते. त्यात तंबाखू नसते. ती टार व कार्बन मोनॉक्साइड सोडत नाही. कमी धोकेदायक निकोटीन पिणे योग्य आहे, असे काहींचे मत असते. मात्र, यासंदर्भात झालेल्या संशोधनानुसार ई-सिगरेट पिणाऱ्या किशोरवयीनांना सिगारेटचे व्यसन लागण्याची शक्यता असल्याचे आढळून आले. ई-सिगरेट तंबाखू सोडण्यात लाभदायक असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ई सिगारेटचे प्रचलन इतक्या दीर्घ काळासाठी झाले नाही की त्याच्या फायदे व हानीच्या बाबतीत पुरेसे पुरावे मिळू शकतील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु