लाल मिरची खाल्ल्याने वाढते आयुष्यमान ! संशोधकांचा दावा

लाल मिरची खाल्ल्याने वाढते आयुष्यमान ! संशोधकांचा दावा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लाल मिरचीचे सेवन केल्यास आयुष्यमान वाढते. या मिरचीच्या सेवनामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होतात. यासंदर्भात अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संशोधनक केले असून लाल मिरचीच्या सेवनाने आयुष्य वाढत असल्याचे त्यांना आढळून आले आहे.

संशोधनातील निष्कर्ष

१) लाल मिरचीच्या सेवनाने मृत्यूदर १३ टक्के कमी होतो. जो मुख्यत: हृदयरोग किंवा स्ट्रोकमुळे होतो.

२) लाल मिरचीचे सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

३) ट्रांसिएंट रिसेप्टर पोटेंसियल (टीआरपी) चॅनल्स, जे कॅप्सीचीनसारख्या एजंटचे प्राथमिक रिसेप्टर्स असतात, आणि हे मिरचीचे प्रमुख तत्व असते. यांची जीवनकाळ वाढण्यासाठी काही भूमिका असू शकते.

४) कॅप्सीचीनचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि धमन्यांमध्ये रक्त प्रवाहाला नियंत्रित करण्यात सेल्युलर आणि आण्विक तंत्रामध्ये काम करतो. यात मायक्रोबियल विरोधी गुण आतड्यांच्या मायक्रोबायोटात बदल करुन अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे जीवनमान वाढवतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु