तुप खाल्ल्याने राहाल सदैव तरुण, ‘हे’ ९ रामबाण उपाय

तुप खाल्ल्याने राहाल सदैव तरुण, ‘हे’ ९ रामबाण उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुप स्वाद वाढवणारे आणि ऊर्जाप्रदान करणारे आहे. म्हणूनच भारतीय खाद्यात तुपाला  खूप महत्त्व आहे. तुप बहुगुणी असल्याने बटरऐवजी तुपाचा उपयोग होतो. तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी अ‍ॅसिड असल्याने ते पचण्यास सोपे असते. तसेच हार्मोनसाठी फायदेशीर असते. बटरमध्ये असलेले लाँग चेन फॅटी अ‍ॅसिड हानिकारक असते. तुपात कॅलरीसह व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियमसारखी पोषकतत्त्व असतात.

तारूण्य  
एक ग्लास दूधामध्ये एक चमचा गायीचे तुप आणि मिश्रि टाकून प्यायल्याने शारीरिक, मानसिक कमकुवतता दूर होते. तसेच तरुण्य दिर्घकाळ टिकते. काळ्या गायीच्या तुपाने तर म्हातारा व्यक्तीदेखील तरुणाप्रमाणे होतो.

गरोदरपणात
गरोदर महिलेने तुपाचे सेवन केले तर गर्भस्थ शिशु ऊर्जावान, पुष्ट आणि बुध्दिमान होतो.

कँसर 
गायीच्या दुधात कँसर अवरोधी गुण असतात. याचे नियमित सेवन केल्याने कँसरची शक्यता खुप कमी असते. विशेषतः हे स्तन आणि आतड्यातील कँसरसाठी चांगले आहे.

थकवा
संभोगानंतर थकवा किंवा कमकुवतता जाणवली तर गायीचे एक ग्लास कोमट दूध प्याल्याने थकवा दूर होतो.

तोंड येणे 
दिवसातून एकदा दूधात तुप टाकून प्यायल्याने आरोग्य चांगले राहते. औषधींमुळे शरीरात उष्णता वाढल्यावर किंवा तोंड आल्यावर हा रामबाण उपाय आहे.

खोकला
जास्त खोकला येत असेल तर गायीचे तुप छातीवर चोळल्याने लवकरच आराम मिळतो.

वजन नियंत्रणात राहते
तुपातील कंजुगेटेड लाईनोलीक अ‍ॅसिड शरीराच्या संयोजी उतींना लुब्रीकेट करते आणि वजन कमी होण्यापासून थांबवते. तुप अँटीऑक्सीडेंट गुणांनी युक्त असते.

सांधेदुखी 
सांधेदुखी, त्वचेचा कोरडेपणा किंवा पंचकर्म शोधन, आयुर्वेदात प्रत्येक ठिकाणी तुपाचा उपयोग अवश्य असतो. शरीर पाण्यातील हानिकारक विद्रव्य घटकांना बाहेर काढते. परंतु तुप आपल्या चरबीतील विद्रव्य घटाकांना बाहेर काढते. तुप पचवणे सोपे असते.

डोळ्यांसाठी फायदेशीर
एक चमचा गायीच्या शुध्द तुपात एक चतुर्थांश मिरपुड टाका आणि सकाळी उपाशापोटी किंवा रात्री झोपताना खा. यानंतर एक ग्लास गरम दूध प्या. डोळ्यांची प्रत्येक प्रकारची समस्या दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु