कढीपत्‍ता खाल्‍ल्‍याने होतो त्वचेच्या इंफेक्‍शनासून बचाव, होतील ‘हे’ फायदे

कढीपत्‍ता खाल्‍ल्‍याने होतो त्वचेच्या इंफेक्‍शनासून बचाव, होतील ‘हे’ फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पदार्थाची रूची वाढविण्यासाठी कडीपत्त्याचा वापर केला जातो. महाराष्ट्रातही कडीपत्ता मोठ्याप्रमाणात स्वयंपाकासाठी वापरला जातो. पदार्थाची रूची वाढवणारा कढीपत्ता त्याच्या औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ओळखला जातो. केस आणि त्वचेसाठी तो अतिशय लाभदायक आहे. कढीपत्त्याचे कोणकोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.

* केस काळे, लांब आणि घनदाट होतात. कोंड्याची समस्याही दूर होते.

* वाळलेल्या कढीपत्त्याच्या पानांची पूड खोबरेल तेलात उकळून घ्यावी. तेल थंड झाल्यावर ते गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवा. झोपण्यापूर्वी हे तेल लावून दुसऱ्या दिवशी नैसर्गिक शांपूने केस धुवावेत.

* कढीपत्त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडे दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर शांपूने केस धुवा. हा उपाय नियमित केल्यास केस काळे आणि घनदाट होतील.

* जिभेची संवेदना वाढते
याचे तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते. त्यामुळे जेवण रुचकर लागते.

* स्किन इन्फेक्शन
नखातील फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासुन बचाव होतो.

* एनीमिया
कडीपत्ता एनीमिया कमी करण्यातही मदत करते.

* यकृतासाठी
कडीपत्त्याचे सेवन केले तर त्यामधील व्हिटामिन ए आणि सी यकृताला योग्य प्रकारे काम करण्यासाठी मदत करतात.

* ब्लड-शुगर लेवल
यातील फायबर ब्लडमधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करते. पचन शक्ती वाढून वजन कमी होते.

* हृदयरोग
यामुळे हृदयासंबंधी रोग दूर होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु