रोज सकाळी खा दोन चमचे खसखस, तल्लख होईल बुध्दी, आणखी आहेत ५ फायदे

रोज सकाळी खा दोन चमचे खसखस, तल्लख होईल बुध्दी, आणखी आहेत ५ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन – खसखस ही वेदनाशामक आहे. यातील अल्केलाइड्समुळे वेदना दूर होतात. खसखसचे तेलही बाजारात मिळते. हे तेल लावल्याने वेदना दूर होतात. खसखसचे असे अनेक उपायोग आहेत. रात्रभर भिजवलेली खसखस केस अथवा त्वचेवर लावल्याने विविध लाभ होतात. खसखस वापरून कोणकोणते फायदे होऊ शकतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

शांत झोप
झोपण्याअगोदर दोन चमचे भिजवलेली खसखस गरम दुधात टाकून घेतल्यास शांत झोप लागते.

कमजोरी
खसखसची खीर करून खाल्ल्यास कमजोरी, थकवा दूर होतो.

निरोगी केस
भिजवलेली खसखस एक तासभर दह्यात भिजवा आणि केसांना लावा. एक तासानंतर केस धुवून घ्या.

ब्रेन पॉवर
दोन चमचे खसखस रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने ब्रेन पॉवर वाढते.

डार्क सर्कल
रात्रभर पाण्यात भिजवलेली खसखस बारीक करून घ्या. यामध्ये एक चमचा दूध मिसळून डोळ्यांखाली लावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु