गोड पदार्थांसोबत ‘हे’ पदार्थ खावेत, वाढणार नाही शुगर

गोड पदार्थांसोबत ‘हे’ पदार्थ खावेत, वाढणार नाही शुगर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सॅलड स्टार्च आणि साखर शोषून घेतो. स्टार्चयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करण्यापूर्वी सॅलडचे सेवन करावे. गाजर, सफरचंद, संत्री आणि शेंगांमध्ये सोल्युबल फायबर असतात आणि हे फायबर आतड्यात जाऊन स्पंजप्रमाणे फुलतात. त्यामुळेच स्टार्च आणि साखर त्यात चिकटते. सोल्युबल फायबरचा विरघळण्याचा वेग मंदावतो. तसेच आतड्यांमध्ये स्टार्च आणि साखर चिकटल्याने ग्लुकोजही हळूहळू रक्तात प्रवेश करतो.

भरपूर स्टार्च किंवा रिफाइंड साखर असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. यामुळे शरीर इन्सुलिन हार्मोन सक्रिय करते आणि रक्तातून पेशींपर्यंत साखरेचा प्रवाह सुरू होतो. अनेक खाद्यपदार्थ काबरेहायड्रेट पचवणे आणि रक्तात प्रवेश करण्याचा वेग मंद करून साखर ब्लॉक करतात म्हणजेच साखर शोषून घेण्याची प्रक्रिया बाधित करतात. अर्कही साहाय्यक असतो. कारण अर्क स्टार्चचे रूपांतर साखरेत करण्याच्या ब्रेकडाऊन प्रोसेसला मंद करतो. अर्कात असलेल्या अँसिटिक अँसिडमुळे एमिलेसची कार्यप्रणाली निष्क्रिय होते.

अर्काची कार्यप्रणाली फक्त स्टार्चवरच फायदेशीर ठरू शकते, रिफाइंड साखरेवर फायदेशीर ठरत नाही. दुर्सया शब्दात सांगायचे झाल्यास जर तुम्ही ब्रेडचे सेवन करत असाल तर ते फायदेशीर ठरेल, परंतु कँडीचे सेवन केल्यास फायदेशीर ठरणार नाही. स्टार्ची किंवा गोड पदार्थांपूर्वी खाण्यात येर्णाया सालाडवर एक चमचा अर्क घालून सेवन करावे.

फॅटी पदार्थांचे सेवन केल्याने पोट र्बयाच वेळेपर्यंत भरल्यासारखे वाटते. जेवण करण्याच्या १० ते ३० मिनिटांपूर्वी फॅटी स्नॅक्सचे सेवन करावे, जेणेकरून पोट भरल्यासारखे वाटेल. तज्ज्ञांच्या मते पोटाची अंतर्गत रचना एखाद्या मस्क्युलर रिंगासारखी आहे. फॅटमुळे पचनक्रिया मंदावते, त्यामुळे गोड खाण्यापूर्वी मूठभर सुका मेवा किंवा एक पीस चीज खावे.

प्रोटीनचा समावेश करावा. कारण प्रोटीनमुळे इन्सुलिन हार्मोनची सक्रियता बाधित होईल. गोड पदार्थांपूर्वी प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. जर प्रोटिनचे सेवन आधी केले तर यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील किंवा राहणार नाही. त्यामुळे आधी चीज, शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि सर्व प्रकारच्या डाळींपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे अवश्य सेवन करावे. कारण यातून भरपूर प्रोटीन मिळते.

भाज्या कमी शिजवाव्यात. कारण भाज्या कमी शिजलेल्या असतील तर त्या पचण्यास वेळ लागेल. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर विरघळणारे फायबर असतात, त्यामुळे त्या शुगर ब्लॉकरचे काम करतात. तसेच यात साखर कमी आणि फायबर जास्त असते, त्यामुळे भाज्या जास्त वेळेपर्यंत शिजवू नये. यामुळे फायबर नष्ट होतील आणि साखर व स्टार्च शोषून घेणे शक्य होणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु