पोट साफ होण्यासाठी झोपण्यापुर्वी खावेत ‘हे’ पदार्थ

पोट साफ होण्यासाठी झोपण्यापुर्वी खावेत ‘हे’ पदार्थ

आरोग्यनामा ऑनलाईन – खाण्याच्या चूकीच्या सवयींमुळे बध्दकोष्ठतेची समस्या वाढते आहे. यावर बाजारात उपलब्ध औषधे घेतल्याने कालांतराने नुकसान होण्याची भिती असते. रात्रीच्या डायटमध्ये फायबरयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने बध्दकोष्ठता कमी करता येते. पोटाच्या समस्येवर विविध उपाय असून यावरील काही महत्वाच्या उपायांची माहिती येथे घेवूयात.

पोट साफ होण्यासाठी बदाम उपयुक्त आहेत. बदाम दोन तास पाण्यात भिजवा आणि त्यानंतर साल काढून खा. तसेच मनुके पाण्यात एक तास भिजवून खाल्ल्यानेही आराम पडतो. पालकाची भाजी किंवा पालक ज्यूस तयार करुन प्यावे. नुसती केळी खाल्ल्याने किंवा शेक बनवून प्यायल्यास पोट साफ होते. सर्दी-पडसे झाल्यावर मात्र केळी खाऊ नये. तसेच पपईदेखील गुणकारी आहे. फ्रूट चाटमध्ये पपई मिसळून खाऊ शकता. ऑरेंज असेच खावे किंवा फ्रूट चाटमध्ये टाकून खावे आराम मिळतो. तसेच भात फ्राय न खावा. आणखी एक उपाय म्हणजे ताजे दही खावे. मात्र सर्दी-पडसे झाल्यावर दही खाऊ नये. तसेच बीट उकळून खाल्ल्याने किंवा ग्रिल करुन खाल्ल्याने पोट साफ होते.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु