स्ट्रॉबेरी खा अन् मधुमेह, हृदयविकारापासून दूर राहा, ‘हे’ १२ फायदे जाणून घ्या

स्ट्रॉबेरी खा अन् मधुमेह, हृदयविकारापासून दूर राहा, ‘हे’ १२ फायदे जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लाल रंगाची रसाळ स्ट्रॉबेरी चवीमुळे सर्वांनाच आवडते. शिवाय स्ट्रॉबेरीचा अनेक खाद्य पदार्थांमध्ये उपयोग केला जातो. आइसक्रीम, मिल्क शेक, चॉकलेट आणि जाम बणवण्यासाठी स्ट्रॉबेरी वापरली जाते. महाबळेश्वर, पाचगणी आणि अगदी पुण्याच्या सासवडमध्ये देखील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरी चवीला जेवढी चांगली आहे तेवढीच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशिर आहे. विविध आजारांवर स्ट्रॉबेरी लाभदायक ठरते. मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांनी ग्रस्त रूग्णांनी स्ट्रॉबेरीचे सेवन आवश्य केले पाहिजे.

हे आहेत उपयोग

* स्ट्रॉबेरी सेवनामुळे हृदयविकार आणि मधुमेह दूर ठेवता येतो.
* पोटॅशियम हे द्रव्य स्ट्रॉबेरीमध्ये मुबलक असल्याने हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत होते.
* तांबड्या रक्तपेशींच्या अभावाने महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त दिसून येते. स्ट्रॉबेरीतील फोलेटमुळे तांबड्या रक्तपेशींची वाढ होते.
* स्ट्रॉबेरीतील सायट्रिक आम्ल आणि इतर आम्लामुळे दात चमकदार आणि हिरड्या मजबूत होतात.
* सांधेदुखीपासूनदेखील स्ट्रॉबेरी दिलासा देते. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात.
* स्ट्रॉबेरीमधील पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
* यातील मँगेनीजमुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो.
* मेदरहित असल्याने वजनावर नियंत्रणात राहते.
* यातील क जीवनसत्त्वामुळे कामाचा थकवा कमी होतो.
* ऑक्साइड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठीदेखील लाभकारक आहे. मोतीबिंदू होत नाही.
* अँटिऑक्सिडंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्त्वे कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.
* क जीवनसतत्वमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा तजेलदार होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु