हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा

हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जेवण केल्यानंतर बडीसोप खाण्याची अनेकांना सवय असते. तर काहीजण बडीसोपसह खडीसाखर सुद्धा खातात. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते, तसेच अन्नपचन सुद्धा व्यवस्थित होते. अशाच प्रकारचे अन्य काही माउथ फे्रशनर सुद्धा असून यातील फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्समुळे अनेक आजार दूर राहतात. हे पदार्थ कोणते आणि त्यापासून होणारे फायदे, याविषयी जाणून घेवूयात.

धनाडाळ
यातील अँटीऑक्सीडेंट्समुळे तोंडाचे इंफेक्शन टाळता येते.

बडीसोप
बडीसोपमध्ये फायबर जास्त असल्याने बध्दकोष्ठता दूर होते.

ओवा
याच्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.

विलायची
यामुहे तोंडामध्ये सलाइवा जास्त झाल्याने अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

आवळा सुपारी
आवळा सुपारीमधील फायबरमुळे अन्नपचन चांगले होते.

लवंग
लवंग किंवा त्याच्या पावडरमध्ये यूजोनॉल असते. यामुळे पोटाची समस्या, पायरियापासून बचाव होतो.

मुलेठी
यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तोंड येण्याची समस्या दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु