बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !

बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर पिळदार होण्यासाठी नियमित व्यायाम, योगा तसेच डायटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ घेणे जरूरी आहे. प्रोटीनयुक्त आहार म्हणजे मांसाहार असा अनेकांचा समज असतो. परंतु, तो चुकीचा असून शाकाहारी पदार्थांमध्येही भरपूर आणि उपयुक्त प्रोटीन्स असतात. तसेच मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी लोकांसाठी चांगल्या प्रतीचे प्रोटीन मिळण्याचे जास्त पर्याय उपलब्ध आहेत. शाकाहारी लोकांनी यासाठी कोणते पदार्थ सेवन करावेत, याची माहिती आपण घेणार आहोत.

१. ब्लॅक बिन्स
आहारात ब्लॅक बिन्सचा समावेश करा. यात प्रोटीन्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक असतात. धुतलेले ब्लॅक बिन्स १४-१६ तास भिजत ठेवून त्याला प्रेशर कुकरमध्ये वाफवा. सॅन्डव्हिचमध्ये किंवा आमटीमध्ये याचा वापर करा.

२. भोपळ्याच्या बिया
व्यायाम केल्यानंतर २ टीस्पून भोपळ्यांच्या बीयांची पूड घ्या. एक टीस्पून भोपळ्याच्या बीयांची पूड नियमित जवळ ठेवा.

३. सुकामेवा
बदाम, काजू, अक्रोड यांचे एकत्रित मिश्रण घ्या. यामुळे स्नायू बळकट होतात. हे मिश्रण खारवलेले नसावे. यामध्ये तीळ मिसळून घेतल्यास स्नायूंना आणखी बळकटी मिळते.

४. हिरवा वाटाणा
वाफवलेले ताजे हिरवे वाटाणे भाजी, पराठा, कटलेट, सूप मध्ये सेवन करा. यातील प्रोटीन आणि अमायनो अ‍ॅसिड असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु