‘या’ ७ पदार्थांमध्‍ये मटणापेक्षाही जास्‍त आयर्न, तंदरूस्‍त राहण्‍यासाठी आवश्य खा

‘या’ ७ पदार्थांमध्‍ये मटणापेक्षाही जास्‍त आयर्न, तंदरूस्‍त राहण्‍यासाठी आवश्य खा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  शरीरात आयर्नची कमतरता निर्माण झाल्यास अ‍ॅनिमीया, श्‍वास घेण्‍यात अडचण, चक्‍कर येणे, सूज इत्‍यादी समस्या होतात. शरीरासह मेंदूसाठीदेखील आयर्न आवश्यक असते. परंतु, ज्या पदार्थांमधून आयर्न मुबलक मिळते असे पदार्थ सेवन केल्यास ही समस्या टाळता येते. हे पदार्थ कोणते याविषयी जाणून घेवूयात.

राजमा
‘या’ ७ पदार्थांमध्‍ये मटणापेक्षाही जास्‍त आयर्न, तंदरूस्‍त राहण्‍यासाठी आवश्य खा

राजमामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते. एक कप राजमामध्ये ४ मिलीग्रॅम आयर्न असते. यामध्‍ये प्रोटीनही भरपूर असते.

ओट्स
Image result for ओट्स

ओट्समध्‍ये आयर्न, पोषणतत्‍त्‍वे भरपूर असतात. यामुळे दीर्घकाळापर्यंत पोट भरल्‍यासारखे वाटते. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

डार्क चॉकलेट
Image result for डार्क चॉकलेट

२८ ग्राम डार्क चॉकलेटमध्‍ये २ ते ३ मिलीग्रॅम आयर्न असते. कमी प्रमाणात हे सेवन केले तरी आयर्नची कमतरता दूर होते.

भोपळ्याचे बी, तीळ
Image result for भोपळ्याचे बी, तीळ

आयर्नच्‍या कमतरता असल्यास भोपळ्याचे बीज तसेच तीळ खावेत. यात आयर्नसह प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन असते.

मशरूम
Image result for मशरूम

मशरूमच्‍या काही प्रकारामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते. ऑयस्टर मशरूममध्‍ये जास्त आयर्न असते.

पालक
Image result for पालक

शंभर ग्रॅम पालकामध्‍ये २.७ ग्रॅम आयर्न असते. पालकाची भाजी, सॅलड खावे.

मसूर डाळ
Image result for मसूर डाळ

या डाळीत प्रोटीनसोबत आयर्नही भरपूर असते. शिजलेल्‍या १ कप म्‍हसुरीच्‍या डाळीत ६.६ ग्रॅम आयर्न असते. मटणापेक्षातही जास्त आयर्न मसूर डाळीतून मिळू शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु