‘ओवा’अशाप्रकारे खा, आजारांमध्ये भासणार नाही औषधांची गरज

‘ओवा’अशाप्रकारे खा, आजारांमध्ये भासणार नाही औषधांची गरज

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ओवा ही पश्चिम आशिया व दक्षिण आशियात उगवणारी औषधी वनस्पती आहे. ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ असून तो पाचक, रुचकर असतो. चवीला तिखट, आंबट, कडवट, उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असणारा ओवा हा अग्नीला प्रदीप्त करतो. वात, तसेच कफदोषाचे शमन, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत होणे आदी समस्यांमध्ये गुणकारी आहे.

ओव्यातील औषधी घटक

ओव्यात ७ टक्के कार्बोहाइड्रेट, २१ टक्के प्रोटीन, १७ टक्के खनिज, ७ टक्के कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, पोटॅशिअम, सोडिअम, थायमिन, रिबोफ्लेविन, निकोटिनिक एसिड अल्प मात्रामध्ये, अंशिक स्वरुपात आयोडीन, शर्करा, सेपोनीन, टेनीन आणि १४ टक्के तेल असते. यामध्ये सुगंधित तेल २ ते ४ टक्के असते.

या आजारांवर गुणकारी

* पोट खराब असेल तर थोडासा ओवा चावून चावून खाऊन एक कप कोमट पाणी प्यावे.

* पोटात जंत झाले असतील तर काळ्या मिठासोबत थोडासा ओवा खावा.

* पोटाशी संबंधित समस्या असल्यास ओवा टाकून चहा प्यावा. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अ‍ॅसिडीटी बंद होते.

* दात मजबूत आणि चमकदार होण्यासाठी ओवा भाजून त्याचे चूर्ण तयार करावे. आठवड्यातून दोन-तीन वेळेस या चुर्णाने दात घासावे.

* दातदुखीमध्ये लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावेत.

* दमा असलेल्या रुग्णांना थंड वातावरणात त्रास होत असल्यास ओवा गरम करून एका छोट्या कापडात बांधून छातीवर ठेवावा.

* कफाचा त्रास दूर करण्यासाठी १०० मि.ली. पाण्यात थोडा ओवा टाकून काही मिनिटे मंद आचेवर उकळून घ्यावा. थंड झाल्यावर या मिश्रणाचे सेवन करावे. यात साखरही टाकता येते.

* ओव्याचे चूर्ण अद्रकाच्या रसामध्ये टाकून सेवन केल्यास खोकल्यात आराम मिळतो. कोरडा खोकला असेल तर थोडासा ओवा विड्याच्या पानामध्ये टाकून सेवन करावा.

* पोटात गॅस होऊन पोट दुखत असल्यास ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून कापडात बांधून किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे.

* ओव्याच्या सेवनाने भूक वाढते. जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा.

* अनिद्रेचा त्रास असेल तर २ ग्रॅम ओवा पाण्यात टाकून घ्यावा. शांत झोप लागेल.

* तोंडाचा वास येत असेल, तोंड आले असेल तर रात्री थोडासा ओवा खावून झोपावे.

* कान दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचा वापर करावा.

* लिव्हरचा त्रास असेल तर ३ ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ या मिश्रणाचे जेवण झाल्यानंतर सेवन करावे.

* सांधेदुखीत ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु