बद्धकोष्ठता झाल्यास खा पेरू; जाणून घ्या, इतर १२ फायदे 

बद्धकोष्ठता झाल्यास खा पेरू; जाणून घ्या, इतर १२ फायदे 

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पेरू हे गोड, रुचकर व स्वादिष्ट फळ आहे. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियायुक्त असते. पेरू मध्ये क, अ, जीवनसत्त्व तसेच लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. पेरूपासून जॅम, जेली, पेस्ट, नेक्टर व इतर पेये तयार करतात. बद्धकोष्ठतेवर पेरू खूप लाभदायक आहे.

हे आहेत फायदे

* एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांगची खूप नशा झाली असेल तर पेरूच्या पानांचा रस प्यायला दिल्यास नशा कमी होऊ शकते.

* पेरूमधील फॉलेटमुळे महिलांमधील फर्टिलिटी वाढते. जर एखाद्या महिलेला आई होण्यात अडचण निर्माण होत असेल तर दररोज पेरूचे सेवन करावे.

* यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. व्हिटॅमिन सी मधील अँटी-ऑक्सीडेंट शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे तत्त्व कॅन्सरशी लढण्यात सहायक ठरते.

* यातील पोटॅशियम तत्व शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करते. यामुळे ब्लडप्रेशर संतुलित राहते. तसेच कोलेस्टेरॉलचा स्तरही कमी होतो.

* यामुळे रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो, कारण यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. हे साखरेला डायजेस्ट करणे आणि इन्सुलिन वाढवण्यात मदत करते.

* चयापचय सुरळीत ठेवण्यात थायरॉइड ग्रंथीची महत्त्वाची भूमिका असते. पेरूमध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे थायरॉइडच्या समस्येत आराम मिळतो. शरीराचे हार्मोनल संतुलन कायम राहते.

* तोंड आले असेल किंवा वारंवार माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून-चावून खावीत.

* यातील पौष्टिक तत्व शरीराला फिट ठेवतात, परंतु पेरू योग्य वेळेवर खावेत. रात्री पेरू खाऊ नये.

* पेरू शरीरातील मेटाबॉलिझम समतोल ठेवल्यात मदत करते. यामुळे पेरूचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

* यात व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते, जे डोळे निरोगी ठेवण्यात सक्षम ठरते. या व्यतिरिक्त पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.

* यात पोटॅशियम तत्व असल्यामुळे याच्या सेवनाने त्वचा उजळते तसेच त्वचेवरील पुरळ, फोड, काळे डाग दूर होतात.

* पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्‍टेरॉल कमी करतात. यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे पुढील डायट पेरू घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु