उपाशीपोटी लसूण खा अन् मिळवा ‘हे’ 4 फायदे,’या’ मोठ्या आजारांपासून होते ‘सुटका’

उपाशीपोटी लसूण खा अन् मिळवा ‘हे’ 4 फायदे,’या’ मोठ्या आजारांपासून होते ‘सुटका’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  लसूण ही एक अशी भाजी आहे ज्याच्याशिवाय जेवणात चव येत नाही. काही लोक असे आहेत ज्यांना अजिबातच लसूण चालत नाही. परंतु लसणाचे फायदे जर तुम्हाला माहीत झाले तर तुम्हीही लसूण खायला सुरुवात कराल. आयुर्वेदात तर लसणाला औषध मानलं गेलं आहे. सकाळी उपाशीपोटी लसूण खाणं खूपच फायदेशीर असतं.

image.png

1) हाय बीपीपासून सुटका- लसूण खाल्ल्याने हाय बीपीशी निगडीत समस्या कम होतात. लसून ब्लड सर्क्युलेशन कंट्रोल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे ते लसणाचे सेवन करून यापासून सुटका मिळवू शकतात.

image.png

2) पोटाच्या आजारांसाठी उपयुक्त- लसणाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांसाठी लसूण खूप उपयोगी ठरतो. पाणी उकळून त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे अतिसार आणि बद्धकोष्ठतापासून आराम मिळतो.

image.png

3) निरोगी हृदय-  लसूण हृदयाशी निगडीत धोक्यांना दूर ठेवण्याचे काम करतो. लसूण खाण्यामुळे रक्त गोठणं कमी होतं. त्यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका कमी होतो.

image.png

4) पचनास मदत-  उपाशीपोटी लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्याने पचनास आणखी मदत होते. यामुळे भूकही लागते. त्यामुळे भूक न लागण्यापासूनही तुमची सुटका होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु