‘फिटनेस’साठी सेवन करा ‘हे’ व्हिटॅमिनयुक्त पदार्थ, धावपळीतही रहाल तंदुरूस्त!

‘फिटनेस’साठी सेवन करा ‘हे’ व्हिटॅमिनयुक्त पदार्थ, धावपळीतही रहाल तंदुरूस्त!

आरोग्यानामा ऑनलाइन टीम :  दररोजच्या कामाची धावपळ, प्रवास, व्यस्त दिनचर्या, व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्याची जबाबदारी, यामुळे बहुतांश व्यक्तींना तारेवरची कसरत करावी लागते. अशा स्थितीत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिम, योगासह आहार खुप महत्वाचा ठरतो. आहारात जास्त प्रोटीन्स, विटॅमिन्सयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नेहमी फिट राहू शकता. यासाठी कोणते पदार्थ नियमित खावेत, ते जाणून घेवूयात.

हे पदार्थ नियमित करा सेवन
अंडे
प्रोटीनसाठी अंड्याचे सेवन नियमित करा. यात विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर असते. पांढरा आणि पिवळा दोन्ही भाग फायदेशीर आहेत. याच्या नियमित सेवनाने मेटॅबोलिज्म रेट चांगला होतो.

पालक
विटॅमिन इ, पोटॅशियम, मॅग्निशियम आणि फायबर मिळण्यासाठी पालकचे सेवन नियमित करा. पालक सुप प्या.

चिकन
चिकन नियमित खा. यात विटॅमिन बी-६ असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. शरीराचे सर्व अवयव चांगले काम करतात.

बदाम
सालीसह बदामचे सेवन करा. यातील विटॅमिन इ शरीरात फॅट सोल्यूबल अ‍ॅन्टि-ऑक्सीडेंट प्रमाणे काम करते. तसेच बदाममध्ये प्रोटीन आणि फायबर अधिक असते.

ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन के अधिक असल्याचे याचे नियमित सेवन करा. यामुळे हाडे मजबूत होतात. शरीराच्या पेशी आणि आतड्यांची वाढ होते. याची भाजी बनवा अथवा सलादमध्ये टाकून खा.

गाजर
डोळ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नियमित गाजरचे सेवन करा. तसेच यामुळे त्वचेचे सौंदर्य सुद्धा वाढते. दातांना किड लागत नाही.

दही
यातील विटॅमिन बी-१२ मुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होते. कमजोरी, थकवा दूर होतो. यासाठी ताज्या दह्याचे सेवन करा.

पपई
पपईमध्ये विटॅमिन सी सर्वाधिक असते. तसेच ग्लायसेमिक इंडेक्सदेखील कमी असतो. मधुमेहाच्या रूग्णांनी आवश्य खावे. यामुळे वजन कमी होते.

लिंबू
यातील विटॅमिन सी मुळे थकवा, कमजोरी जाणवत नाही. यातील अ‍ॅन्टि-ऑक्सिडेंट त्यांना बाहेरील संक्रमणापासून वाचवते. पचनसंस्था सुधारते. वजन कमी होते.

Visit : Arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु