यासोबत खा अंडे, होईल दुप्‍पट फायदा, जाणून घ्या ‘हे’ खास पदार्थ कोणते

यासोबत खा अंडे, होईल दुप्‍पट फायदा, जाणून घ्या ‘हे’ खास पदार्थ कोणते
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अंड्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात असतात. यामुळे अंडे मोठ्याप्रमाणात सेवन केले जाते. परंतु, अंडी अन्य काही पदार्थांसोबत खाल्ल्यास त्याचे गुण आणखी वाढून जास्त फायदा होऊ शकतो. अंडे कोणत्या पदार्थांसोबत आणि कसे खावे, याविषयी माहिती घेवूयात.

असे खा खंडे : –

ऑलिव्ह ऑइल – अंड्यामधील बायोटिन आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे स्किनचा ग्लो वाढतो.

जिरा पावडर – या दोन्हींमध्ये आयरन अधिक असते. ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. हे खाल्ल्याने एनर्जी मिळते.

हळद – अंड्यावर हळद टाकून खाल्ल्याने चरबीचे विघटन होते. यामुळे वजन कमी होते.

मिरपूड – यातील फायटोन्यूट्रिएंट्समुळे वजन कमी होते. उकडलेल्या अंड्यावर मिरपूड टाकून खाल्ल्याने वजन जलद कमी होते.

काळे मीठ – यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असल्याने दम्यासारखे श्वासांचे आजार होत नाहीत. पचनक्रियाही ठीक होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु