चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये

चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – हृदयाला तंदुरुस्त ठेवायचे असल्यास चॉकलेट खावे, सल्ला काही तज्ज्ञ देतात. कारण, विशिष्ट प्रमाणात चॉकलेट सेवन केल्यास हृदय निरोगी राहते. स्ट्रोक, विस्मरण, हृदयक्रिया बंद पडणे हे धोके टाळले जाऊ शकतात, असे ब्रिटीश मेडिकल जर्नल, हार्ट या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.

असे केले संशोधन
* ५० ते ६४ वयोगटातल्या ५५ हजार लोकांवर प्रयोग करण्यात आला.
* आहारात एका विशिष्ट प्रमाणात केलेला चॉकलेटचा समावेश या लोकांच्या हृदयासाठी लाभदायक ठरल्याचे दिसूल आले.
* चॉकलेटचे अतिरिक्त सेवन केल्यास शरीरात चरबी आणि साखर वाढू शकते, असा इशारा या संशोधकांनी दिला आहे.
* हृदय तरुण ठेवायचे असल्यास विशिष्ट प्रमाणात चॉकलेट खावे, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु