पीरियड्सच्या काळात तिला हवी तुमची साथ, ‘ही’ १० कामे तुम्ही केल्यास मिळेल आराम

पीरियड्सच्या काळात तिला हवी तुमची साथ, ‘ही’ १० कामे तुम्ही केल्यास मिळेल आराम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पीरियड्सच्या काळात महिलांमध्ये विविध शरीरिक आणि मानसिक बदल होत असल्याने त्यांना पतीच्या सहकार्याची, मदतीची अपेक्षा असते. योग्य वेळी तिला तुमच्याकडून सहकार्य मिळाले तर तिचा त्रास कमी होऊ शकतो. पुरुषांनी महिलांच्या पीरियड्सला घाण किंवा अ‍ॅब्नॉर्मल अ‍ॅक्टिव्हीटी प्रमाणे समजू नये. उलट तिला मदत करावी. पुरूषांनी याकाळात कोणती मदत करावी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

तिचा मूड ओळखा
पीरिययड्सच्या काळात महिलांमध्ये चिडचिड वाढते. अशावेळी तिचा मूड पाहून सहकार्य करा.

हॉट वॉटर बॉटल द्या
पीरियड्समध्ये पोटदुखी होणे ही सामान्य गोष्ट आहे. तिला हॉट वॉटर बॉटल तयार करून द्या. यामुळे आराम मिळू शकतो.

डार्क चॉकलेट द्या
डार्क चॉकटलेटमधील फ्लेवनॉइड्स मूड चांगला करते. त्यामुळे या काळात तिला डार्क चॉकलेट द्या.

फळे, भाज्या द्या
केळी, पपई यासारखी फळे आणि हिरव्या भाज्या या काळातील वेदना कमी करतात. त्यामुळे अशी फळे आणि भाज्या खाण्यास द्या.

मसाज करा
या काळात महिलांना कंबरदुखीची समस्या होते. तुम्ही हलक्या हातांनी मसाज करून दिल्यास आराम मिळू शकतो.

व्यायाम करण्यास सांगा
हलका व्यायाम अथवा योगा केल्यास पेल्विक भागातील वेदना आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो.

जास्त पाणी द्या
पीरियड्सच्या काळात बॉडी जेवढी हायड्रेट असेल तेवढ्या वेदना कमी होतात.

आराम करू द्या
तिला या काळात जास्त काम करू देऊ नका. आराम करू द्या. यामुळे वेदना कमी होतील.

चहा, कॉफी, स्पाइसी फूड
या काळात तिला जास्त चहा, कॉफी आणि स्पाइसी फूड देऊ नका. अन्यथा वेदना वाढू शकतात.

डॉक्टरांकडे जा
या काळात जास्त ब्लिडिंग होत असेल तर डॉक्टरांकडे जा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु