गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गर्भवती महिलांच्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की, गर्भावस्थेत प्रवास करायला पाहिजे की नाही. हे खरे आहे की, प्रेग्नेंसीमध्ये थकवा जाणवत असतो. अशामध्ये प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन महिला परेशान होऊन जातात. जास्त करुन महिला आपल्या पोटातील बाळाच्या चिंतेचा विचार करत असतात. खासकरुन खूप तासाचा प्रवास पण जेव्हा प्रवास करण्यास भाग पडले तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशावेळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच काही महत्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. तेव्हाच प्रेग्नेंसीमध्ये आपला प्रवास सुखकर होईल.

image.png

प्रेग्नेंसीदरम्यान प्रवास करताना आपल्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर लक्ष देणे महत्वाचे आहे. नाहीतर थोडा बेजबाबदारपणा ही बाळाच्या जीवाला धोका निर्माण करु शकतो. जर गर्भवती महिला ट्रेन, बसने, विमानाने किंवा कारने प्रवास करत आहे. तेव्हा काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला या माहितीच्या आधारे काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला प्रवासामध्ये फायदेशीर ठरतील. गर्भवती महिलांनी पुढील काही गोष्टी करा आणि काही गोष्टी टाळा.

१. प्रेग्नेंसी दरम्यान जितके शक्य होईल तेवढे प्रवास करणे टाळा. कारण सुरुवातीचे तीन महिने आपल्या आणि बाळासाठी खूप नाजूक असतात. यामध्ये जास्त प्रवास करणे म्हणजे आपल्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणे आहे. त्यामुळे पहिले तीन महिने प्रवास टाळावा.

२. तीन महिने उटल्यानंतर तुम्ही चौथ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्यापर्यंत प्रवास करु शकता. यादरम्यान आपल्याला उल्टीसारखे समस्या जाणवत नाही.

image.png

३. गर्भावस्थामध्ये जर तुम्ही कारने प्रवास करत असाल तर कारमध्ये बसताना सगळ्यात पहिले सीट बेल्ट लावा, आणि लक्ष ठेवा की, सीट बेल्ट पोटावर येऊ नये.

image.png

४. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि  तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तेव्हा नेहमी लोअर सीट बुक करा. वरच्या सीटवर बसण्याचे टाळा. वरच्या सीटमुळे चढणे आणि उतरणे शक्य होत नाही.

image.png

५. जर तुम्ही प्रेग्नेंसीदरम्यान विमानाने प्रवास करत असाल तेव्हा महिलांना एअरलाइनचे  रुल्स वाचणे गरजेचे आहे कारण काही एअरलाइन गर्भवती महिलांना विमानाने प्रवास करण्यात परवानगी देत नाही. प्रत्येक फ्लाइटचे नियम वेगवेगळे आहेत. यासाठी ते रुल्स माहित असणे गरजेचे आहे.

image.png

६. जेव्हा गर्भवती महिला प्रवास करत असेल तेव्हा तिने खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये नेहमी आपल्याकडे पाणी ठेवा. ट्रेन किंवा स्टेशनवर पाणी घेऊ नका कारण हे पाणी पुर्णपणे स्वच्छ असते असे नाही. यासाठी आपल्याकडे पाणी असणे गरजेचे आहे. ते पाणी तुम्ही वारंवार प्या कारण सारखे पाणी पिल्याने आपल्या शरीरात पाण्याची कमी जाणवत नाही.

image.png

७. स्टेशन किंवा ट्रेनमधील खाद्यपदार्थ खाणे टाळा. हे स्वच्छ नसतात ते खाल्याने तुम्हाला फूच पॉइजनिंग होऊ शकते. जर तुम्हाला काही खावेसे वाटले तर तुम्ही घरचे पदार्थ सोबत ठेवा जे खूप खराब होणार नाही.

image.png

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु