पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात चांगल्या पाण्यात पावसाचे पाणी मिक्स होते. या खराब पाण्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिणे गरजेचे असते. कारण अस्वच्छ पाणी आपल्या शरीरात अनेक आजारांची निर्मिती करते.

१) खराब पाण्यामुळे अमीबाची लागण होऊ शकते. यामध्ये पोटात दुखणे, जुलाब, चिकट संडास होते.

२) पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरासारखे आजार होतात.

३) दूषित पाणी पिल्याने पोटात जंत होतात. यामुळे भूक कमी लागते. अंगावर पांढरे चट्टे येतात.

४) पावसाळ्यात व्यवस्थित जेवण न केल्याने हिमोग्लोबिन कमी होण्याची दाट शक्यता असते.

५) ताप, सर्दी, कावीळ हे आजार आपल्याला दूषित पाणी पिल्यामुळे होतात. त्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला पाणी कितीही चांगले दिसले. तरी ते पाणी व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. आणि मगच प्या. तरच तुमचा वरील आजारांपासून बचाव होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु