‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – आरोग्य प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी आहारनियमन किंवा व्यायाम आवश्यक आहे. काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून तंदुरुस्त राहणे शक्य आहे. लठ्ठपणा हा अनेक आजारांना कारणीभूत ठरतो. यासाठी लठ्ठपणाला टाळण्यासाठी नेहमी जागृत राहणे गरजेचे आहे.

निरोगी जीवनासाठी खूप कष्ट न करता केवळ काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर निरोगी जीवन जगता येऊ शकते तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार आणि थोडासा व्यायाम केला तरी पुरेसे आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराचे आरोग्य राखण्यासाठी काही नैसर्गिक उपयांची आपण माहिती घेणार आहोत. यातील पहिला उपाय म्हणजे दिवसातून तीन ते पाच कप हिरवा चहा पिल्यास ३५ ते ४३ टक्के मेद वापरणे शक्य होते.

तसेच नारळाच्या पाण्यात इलोक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असल्याने नारळ पाण्याच्या सेवनाने नैसर्गिकरीत्या चयापचय क्षमता वाढते आणि ऊर्जाही प्राप्त होते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे बराच वेळ व्यायाम आणि कष्टाचे काम करता येईल. तसेच वजनही लवकर कमी होईल. जेवणापूर्वी एक ग्लास भाज्यांचा रस पिल्यास भूक कमी लागते आणि उष्मांकही कमी मिळतात. जर भाज्यांचा रस प्यायचा नसेल तर जेवणापूर्वी एक-दोन ग्लास पाणी प्यावे. त्यामुळेही भूक कमी लागते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु