‘थर्माकॉल’च्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या साइड इफेक्ट्स

‘थर्माकॉल’च्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या साइड इफेक्ट्स

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पूर्वी लोक मातीच्या किंवा काचेच्या कपातून चहा घेत. त्याची जागा आता थर्माकॉल आणि प्लॅस्टिकने घेतली आहे. मात्र जेवढे प्लास्टिक आरोग्यासाठी घातक आहे त्याच्यापेक्षाही थर्माकॉल अधिक घातक आहे. थर्माकॉल कॅन्सरसारख्या गंभीर रोगाचे कारण ठरू शकतो. जाणून घ्या थर्माकॉलचे साइड इफेक्ट्स –

थकवा, हॉर्मोनल बदल , कॅन्सर –
थर्माकोलचे कप पॉलीस्टीरीनपासून बनलेले असतात, जे आमच्या आरोग्यासाठी खूपच घातक असतात. थर्माकॉलच्या कपातून गरम चहाबरोबरच थर्माकॉलमध्ये असलेली काही घटक तत्वे शरीरात जातात. ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. थर्माकॉलचे स्टाइरीन सारखे घटक शरीरात गेल्यास थकवा, हॉर्मोनल बदल यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

अ‍ॅलर्जी –
जर तुम्ही नेहमीच थर्माकॉलच्या कपातून चहा, कॉफी यांसारखे गरम पदार्थ घेत असाल तर तुम्हाला अ‍ॅलर्जी होऊ शकते. थर्माकॉलच्या अतिवापरातून होणाऱ्या अ‍ॅलर्जीची सुरुवात घशात खवखवणे यांपासून होते. तसेच बॉडीवर रॅशेज येऊ लागतात आणि हळूहळू ते जास्त प्रमाणात वाढू लागतात.

पोटदुखी –
थर्माकॉलच्या नियमित वापरामुळे पोट दुखीसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. थर्माकॉल पूर्णपणे हायजीनिक नसतात. यात गरम पदार्थ टाकल्यानंतर बॅक्टेरिया आणि किटाणू विरघळतात आणि शरीरात जातात.

पचन संस्थेवर परिणाम व इन्फेक्शन –
थर्माकॉलच्या कपातून चहा बाहेर निघू नये म्हणून त्यावर वॅक्सचा थर चढवण्यात येतो. चहा किंवा कॉफीचे सेवन करतो त्याबरोबरच थर्माकॉलच्या कपाचे वॅक्सदेखील शरीरात जाते. यामुळे आतड्यांची समस्या आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम पचन संस्थेवर होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु