सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५

सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सकाळी उपाशीपोटी गरम पाणी प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे होतात, असे सांगितले जाते. यामुळे पोट साफ होणे, वजन कमी होणे, असे लाभ होतात. परंतु, गरम पाणी पिल्याने शरीरातील काही भागांचे नुकसानही होण्याची शक्यता असते. आयुर्वेदातील तज्ज्ञ सांगतात की, कोमट पाणी पिल्याने फायदे होऊ शकतात परंतु, अत्यंत गरम पाणी पिणे सुद्धा नुकसानदायक आहे.

ही आहेत कारणे –

१) लोखंडी नळातून येणारे पाणी गरम करून पिल्यास त्यातील लोह शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकते.

२) सोलर सिस्टीम तसेच वाटरकुलरमधून येणारे गरम पाणीही हानिकारक आहे.

हे नुकसान होते –

१) नियमितपणे गरम पाणी प्यायल्यास रक्तदाब वाढू शकतो. हार्ट बीट वारंवार कमी-जास्त होतात. रक्तदाबाचा त्रास असल्यास गरम पाणी पिऊ नये.

२) जास्त गरम पाणी पिल्याने कमी श्वास घेण्याची समस्या होऊ शकते. अस्थमाच्या रुग्णांनी असे पाणी टाळावे.

३) रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिल्याने झोप बिघडते. गरम पाणी पिणे थांबवावे.

४) अधिक गरम पाणी पिल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते. किडनीच्या कॅपेलरीज खुप पातळ असतात. गरम पाण्याने त्या पसरतात. त्या योग्य काम करू शकत नाहीत. किडनीची समस्या असल्यास गरम पाणी पिऊ नये.

५) जास्त गरम पाणी पिल्याने तोंडाला फोड येऊ शकतात. शरीरातील काही भागांमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु