रोज सकाळी प्या ‘हे’ पेय, दिवसभर घेऊ शकता उत्साह आणि उर्जेचा अनुभव

रोज सकाळी प्या ‘हे’ पेय, दिवसभर घेऊ शकता उत्साह आणि उर्जेचा अनुभव

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कितीही घाई असली तरी सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका, असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमी देत असतात. कारण सकाळी केलेला नाश्ता तुम्हाला दिवसभर उर्जा आणि उत्साह देतो. जर नाश्ता करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर बनाना मिल्क शेक घ्या. कारण तो झटकन तयार होतो. शिवाय तो घेण्यास वेळही लागत नाही. बनाना शेक शरीराला पोषक असून यामुळे लवकर भूकही लागत नाही. बनाना मिल्कशेक पिण्याचे कोणते फायदे आहेत, हे जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

बनाना मिल्क शेकमधील विटामिन बी-६ रक्त पुरवठा सुरळित ठेवते.

दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. केळी आणि दुधामुळे शरीराची आवश्यकता पूर्ण होते.

दूधातील विटॅमिन ए प्रतिकार शक्ती चांगली ठेवते.

केळ्यातील पॅक्टीन फायबरमुळे पाचनतंत्र व्यवस्थित राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

दूधातील कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु