जिरे-आल्याचा रस प्या…आणि १० दिवसात पोट कमी करा

जिरे-आल्याचा रस प्या…आणि १० दिवसात पोट कमी करा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फास्ट फूडचे अतिसेवन, वाईट सवयी, बिघडलेली आहार पद्धती आणि एकाच ठिकाणी तासनतान काम करावे लागत असल्याने पोट सुटण्याची समस्या अनेकांना सतावते. विशेष म्हणजे ही समस्या फक्त तरूण आणि प्रौढांमध्येच नव्हे तर सर्वच वयागटात आढळून येत आहे. वाढलेल्या पोटामुळे व्यक्तीमत्वावरही परिणाम होतो.

शरीर बेढब दिसूल लागते. त्यामुळे पोटाचा वाढलेला घेर कमी करणे जरूरी आहे. यावर जिरे आणि आल्याच्या घरगुती उपाय केल्यास दहा दिवसात चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.आलं पचनक्रिेयेत महत्त्वाची भूमिका बजावते. आलं उष्णता निर्माण करत असल्याने पचनाची प्रक्रिया सुलभ होते. जिऱ्यात पोटॅशियम, लोह यांचे प्रमाण जास्त असते. तसेच जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि के सुद्धा असते.

यामुळे फॅट्स आणि शरीरास हानीकारक असलेले कोलेस्ट्रॉल कमी होते. आले आणि जिरे यांचा रस तयार करण्यासाठी एक चमचा जिरे आख्खे किंवा पावडर घ्यावी आणि आले घ्यावे. हे दोन्ही पदार्थ ५०० मिली पाण्यात टाकून पाणी उकळावे. पाणी २५० मिली होईल तोपर्यंत उकळावे. नंतर गाळून थंड करून हा रस प्यायल्यास आणि दररोज ४५ मिनिटे व्यायाम केल्यास पोटाचा घेर कमी होतो. जिरे आणि आल्याचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होऊन दिवसभरात जास्त कॅलरी बर्न होतात. यामुळे भूकही कमी लागते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु