रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मनुके खाण्याचे फायदे अनेकांना माहित असतीलच. मनुक्यांइतकेच मनुक्यांचे पाणीही शरीराला उपयुक्त आहे.  मनुक्याच्या पाण्यात  व्हिटामीन आणि मिनिरल्स असतात. तसेच भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खावेत. जाणून घेऊयात मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे व बनवण्याची पद्धती याविषयी

असे तयार करा मनुक्याचे पाणी

साहित्य – १ ग्लास पाणी , १५० ग्रॅम मनुके
कृती – एक ग्लास पाणी उकळून घ्या. त्यात मूठभर मनुके रात्रभर भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून कमी आचेवर गरम करून घ्या. हे पाणी सकाळी  रिकाम्या पोटी प्या.

मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे 

मनुक्याचे पाणी रोज सेवन केले तर त्वचेवरी सुरकुत्या कमी होतात व तुम्ही तरुण दिसू लागता .

यात मोठ्या प्रमाणात लोह असते त्यामुळे अ‍ॅनिमियासारख्या आजारावर मनुका गुणकारी आहे.

दररोज मनुक्याचे पाणी प्यायल्यास मेटाबॉलीझमचा स्तर कमी राहील , पचन व्यवस्थित होईल.

जर तुम्हाला बद्धकोष्ठता, थकवा, अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर हे पाणी फायदेशीर ठरू शकते.

तुम्हाला ताप आला असेल तर या पाण्याचे सेवन करावे.  ताप झटपट उतरतो.

अनेक लोकांना खाण्यापिण्याच्या वाईट समस्यांमुळे कोलेस्ट्रॉलची समस्या असते. यामुळेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मनुक्याच्या पाण्याचे सेवन करा.

मनुक्याच्या पाण्याच्या  सेवनाने हायपरटेन्शनसारख्या समस्या दूर होतात.

एनर्जी  व रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मनुक्याचे पाणी उपयोगी आहे.

मनुक्याच्या पाण्याच्या  सेवनाने हृदयाचे आरोग्यही राखले जाते. तसेच  मनुक्याच्या पाण्याच्या  सेवनाने दृष्टी सुधारण्यास मदत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु