मुलांच्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको

मुलांच्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको

पुणे : आरोग्यनामा ऑनालाइन – मोठी माणसे तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी नेहमीच धडपडत असतात. परंतु, मोठ्या माणासांपेक्षाही छोट्यांचे मौखिक आरोग्य महत्वाचे ठरते. कारण तोंडाचं आरोग्य योग्यप्रकारे न राखले गेल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लहान वयातच मुलांना याबाबत चांगल्या सवयी लावल्यास ते त्यांच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतं. पालकांनी मुलांसोबत दात घासले पाहिजेत. किंवा त्यांच्या आवडीचा टूथब्रश देऊन तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

दात तुटणे किंवा तशा काही समस्या असल्यास लहान मुलांच्या दंत चिकित्सकांना दाखवणे. विशेष म्हणजे तुटलेला दात दुधात बुडवून तो डॉक्टरांकडे नेणे. फिलिंग, रूट कॅनल, कॅप बसवणे असे काही उपचार दुधाच्या दातांवरही करणं शक्य असतं आणि ते लहान मुलांच्या दंत चिकित्सकांच्या सल्ल्यानुसारच केले पाहिजेत. मुलांच्या दातांना तार (ब्रेसस) लावण्याचं योग्य वय हे १२ ते १३ वर्ष आहे. मुलांना दातांच्या समस्या नसल्या तरी दंत चिकित्सकांकडून प्रत्येकी ६ महिन्यांनी दातांची नियमित तपासणी करून घेणे. ज्यामुळे भविष्यात काही समस्या उद्भवणार नाही. आपल्या बाळाचे मौखिक आरोग्य जपण्यासाठी त्याच्या पहिल्या वाढदिवशी त्याच्या दातांची तपासणी करून घ्यायला हवी.

लहान मुलांचे दंत चिकित्सिक मुलांचं वेगळं वर्तन आणि मानसशास्त्र समजतात. बाळाला काही भरवल्यानंतर त्याच्या हिरड्या स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं ठरतं. मुलांचे दात किडू नयेत, यासाठी पालकांचे दातही निरोगी असायला हवेत. वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत टूथपेस्टची गरज नसते. ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी कमी फ्लूरॉईड असलेली टूथपेस्ट वापरू शकता. ६ ते १२ वयोगटातील मुलांसाठी शेंगदाण्याच्या आकारइतकी टूथपेस्ट वापरावी. दातांच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय लहान मुलांच्या दंत चिकित्सकांच्या सल्ल्यानुसारच केले पाहिजेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु